आलं भारतीय आहारात रोज वापरले जाणारे आणि बाजारात सहज
उपलब्ध होणारे आहे. आयुर्वेदात आल्यालं खूप अनन्यसाधारण
महत्त्व आहे. सकाळच्या चहा पासून रात्रीच्या जेवणापर्यंत आल्याचा
वापर केला जातो. खासकरून चहा आणि नॉन-व्हेज यामध्ये
हमखास वापर केला जातो. आलं जेवणाचा सुगंध आणि टेस्ट हि
वाढवितो. तसेच सर्दी खोकला यासारख्या आजारावर रामबाण उपाय
ठरतो. आलं हे प्रत्येक आजारावर रामबाण आहे. आम्ही आमच्या
लेखातून सविस्तर मध्ये आलं विषयी माहिती द्यायचा प्रयत्न करू.

Table of contents
३ ३) मासिक पाळीच्या समस्यांवर उपयुक्त –
७ ७) अपचनाची समस्या दूर होते –
९ ९) घसा बसण्याच्या समस्येवर उपयुक्त आलं –
१११) कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते –
११२) श्वसनविकारावर उपयुक्त आलं –
११४) केसांच्या वाढीसाठी उपयुक्त –
११५) कर्करोगावर (cancer) रामबाण –
१ १) डोकेदुखीवर उपयुक्त –
आल्याचा चहा पिल्याने डोकेदुखी थांबू शकते. आल्याचे पेस्ट
करून जर तुम्ही डोकेदुखीच्या ठिकाणी म्हणजेच कपाळावर लावलात
तर काही क्षणातच तुमची डोकेदुखी कमी होईल.
अधिक वाचा सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे
२ २) दाढ दुखीवर रामबाण –
अनेकांना दातांच्या समस्या देखील असतात. दातांना किड
लागणे, दाढ दुखी, हिरड्यांचा त्रास यावर रामबाण म्हणजे आलं.
आल्याचा तुकडा जर तुम्ही दुखत्या दाढेवर ठेवलात तर काही
मिनिटातच तुम्हाला दाढदुखण्यापासून आराम मिळेल.
३ ३) मासिक पाळीच्या समस्यांवर उपयुक्त –
स्त्रियांच्या मासिक पाळीच्या समस्या म्हणजेच मासिक पाळी
दर महिन्याला न येणे, पिशवीच्या समस्या अशा समस्यांपासून
सुटका मिळते. तर यासाठी समप्रमाणात पाण्यात खिसलेले आले
टाकून ५ मिनिटे उकळून ते पाणी दिवसातून तीनवेळा प्या. मग या
मासिक पाळीच्या समस्या काही महिन्यातच नियमित होईल.
अधिक वाचा चहा पिल्याने काय होते | चहाचे प्रकार |
४ ४) कॅन्सरवर उपयुक्त –
कँसर असणाऱ्या व्यक्ती जर आल्याचा नियमित सेवन करतील
तर त्यांचा कँसर हळूहळू नाहीसा होत जातो.
५ ५) त्वचारोगावर उपयुक्त –
त्वचेवरील समस्या असणारी व्यक्तीने जर आल्याचा नियमित
सेवन केले तर त्या समस्या कमी होऊ लागतात. त्वचेवर जर फंगल
infection झाले असेल तर त्यावर आल्याचा रस लावल्याने तेही कमी
होते.
अधिक वाचा तूप आणि गूळ खाण्याचे फायदे | Benefits of eating ghee and jaggery
६) संधिवातावर रामबाण –
संधिवाताचा त्रास देखील अनेकांना त्रासदायक ठरला आहे.
अशा या संधिवाताच्या दुखण्यावर आल्याचे वाटण करून लावल्यावर
सांध्यावरील सूज कमी होऊन त्रासदायक वेदना हि कमी होतात. १०
ml आल्याच्या रसामध्ये १ चमचा तूप मिसळून प्यायल्याने पाठ,
मांड्या, कंबर यातील वात कमी होण्यास मदत होते. तसेच २ चमचे
आल्याच्या रसात १-१ चिमूठ सेंधव मीठ व हिंग मिसळून मालिश
करावी अशा प्रकारे आला हे संधिवातावर उपयुक्त ठरू शकते.
७) अपचनाची समस्या दूर होते –
भूक न लागणे, उलट्या होणे, पोट साफ न होणे इत्यादी
समस्येवर आलं उपयुक्त ठरते. आल्यामध्ये व्हिटॅमिन, कॅरोटीन,
थायमिन, रोबिक्वीन, रायबोफ्लेवीन, जीवनसत्व क हे समाविष्ट असते.
आलं हे उष्ण आणि तीक्ष्ण गुणधर्मयुक्त पदार्थ आहे. जेवण
करण्यापूर्वी ३-४ ग्राम आल्याचा तुकडा मीठ लावून खाल्यास
आपल्याला पचनसंबंधीच्या समस्यांपासून आराम मिळतो. ताज्या
आल्याचा रस, लिंबूचा रस व त्यात सेंधव मीठ मिसळून त्याचे सेवन
तुम्ही जेवणापूर्वी आणि जेवण झाल्याच्या नंतर कोमट पाण्यातून
घ्यावे. हे मलावरोध व गॅसच्या समस्येवर हितकारक ठरते. आलं हे
उष्ण असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्याचे सेवन कमी
प्रमाणात करावे.
अधिक वाचा वेलची (वेलदोडे) खाण्याचे फायदे
८) सर्दी खोकला वर उपयुक्त –
बदलत्या ऋतुमानानुसार सर्दी खोकला होणे हे
सामान्य आजार आहे. सामान्य आजार असला तरी याकडे दुर्लक्ष्य
करून चालत नाही. यावर घरच्या घरी उपयुक्त इलाज म्हणजे आलं.
आलं, सेंधव मीठ व मिरे कुटून त्याची वाटण जेवणापूर्वी सेवन
करावे. आल्याचा रस व मध प्रत्येकी ५-५ m l मिसळून दिवसातून
तीनदा घ्यावे. त्यात लिंबाचा २ थेंब रस टाकल्यास अतिउत्तम
राहील. गरम दुधात आलं टाकून उकळून दूध पिल्याने सर्दी, खोकला
वर आराम मिळतो. अशाप्रकारे घरच्याघरी तुम्ही सर्दी खोकल्यावर
इलाज म्हणून आल्याचा वापर करू शकता.
९) घसा बसण्याच्या समस्येवर उपयुक्त आलं –
घसा बसणे हि समस्या सारखीच उद्भवत असते.
तर त्यावर उपाय म्हणजे आल्याचा रस समप्रमाणात मधामध्ये
मिक्स करून त्याचे चाटण घेतल्याने बसलेला घसा मोकळा होतो व
आवाज हि मधुर होण्यास मदत होते.
१०) कफाचा खोकल्यावर रामबाण –
ज्या व्यक्तीला कफाचा खोकल्याचा त्रास असेल
त्या व्यक्तींनी आल्याचा रस, मध व हळद एकत्र घेतल्यास कफाचा
खोकल्यावर आराम मिळतो.
११) कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते –
जवळ जवळ जास्तीत जास्त लोकांना
कोलेस्ट्रॉलचा त्रास सुरु आहे. तर त्यांनी आल्याचे सेवन करणे फार
गरजेचे आहे. आल्याचे सेवनाने रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.
आल्याचे सेवन केल्याने रक्ताच्या गुठळ्या होत नाही. यामुळे
कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. ह्रदयविकार असणाऱ्या
व्यक्तींनी जर आपल्या आहारात आल्याचा सेवन केला तर त्या
आजारापासून वंचित राहू शकतात.
अधिक वाचा ग्रीन टी कधी प्यावी. ग्रीन टी चे फायदे| benefits of green tea.
१२) श्वसनविकारावर उपयुक्त आलं –
जुनाट डांग्या क्षयरोगाचा खोकला, सर्दी, भरलेली
छाती, कफ आणि दम्यासाठी आल्याचा रस मधासोबत दिवसातून
तीनवेळा घ्यावा. आल्याचे तुकडे पाण्यात उकळवून त्यात चवीप्रमाणे
साखर टाकून ते पाणी गरम गरम प्यावे. आल्याचा नियमित चहा
घ्यावा. आल्याचा रस खडीसाखरेसोबत चाटण घ्यावे. कफ पातळ
होण्यासाठी सुंठ आणि खडीसाखर यांचा काढा घ्यावा.
१३) वजन नियंत्रित राहते –
नियमित आल्याचे सेवन करून आपले वजन कमी
करता येते. आलं खाल्याने चयापचनाची क्रिया व्यवस्थित होते. व
लठ्ठपणा होण्यास मदत होते. आलं हे उष्ण असल्यामुळे शरीरातील
अनावश्यक चर्बी (fat) वितळवण्यास मदत होते. आपले वजन व
लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. त्यामुळे आल्याचे नियमित
सेवन करत जा.
१४) केसांच्या वाढीसाठी उपयुक्त –
केसगळतीची समस्या भरपूर जणांची आहे. तर
यावर रामबाण म्हणजे आल्याचा रस पिणे खूप फायदेशीर आहे.
केसांच्या मुळांमध्ये आपण आल्याचा रस देखील वापरू शकता.
केसांच्या मुळाशी रक्ताभिसरणाचा वेग वाढवण्याबरोबरच ते हेअर
कंडिशनर म्हणून देखील काम करते. हेअर प्रोब्लेमसाठी आलं हे
उत्तमरीत्या उपयुक्त ठरते.
१५) कर्करोगावर (cancer) रामबाण –
आल्यामध्ये कर्करोगविरोधी लढाऊ घटक आहेत ते
कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करतात आणि त्यांचा नाश करतात.
शास्त्रीय अभ्यासानुसार आले स्तन, डिम्बग्रंथि, त्वचा अशा
कर्करोगाशी लढायला मदत करू शकते. आल्यामध्ये अँटीऑक्सिडेंट
देखील असते. अँटीऑक्सिडेंट आपल्या शरीराला विषाणू पासून दूर
ठेवण्यास मदत करतात म्हणून आपण संपूर्ण कर्करोग टाळू शकतो.
१६) स्मरणशक्ती सुधारते.
आलेमधील असणारे अँटीऑक्सिडंट्स मेंदूच्या सभोवतालच्या
घातक घटकांना काढून टाकण्यास मदत करून पार्किन्सन
(Parkinson’s)आणि अल्झायमरस् (Alzheimer’s) ला योगदान देतो.
आल्याचा सुगंध आपले मन तीव्र आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करू शकतो.
दक्षता –
रक्तपित्त, उच्च रक्तदाब, रक्तस्त्राव, अल्सर, असणाऱ्या
व्यक्तीने आल्याचे सेवन करू नये. आले कधीही फ्रीझ मध्ये ठेवू नये.
आलं खाण्याचे नुकसान –
१) आल्यामध्ये उष्णतेचा स्रोत असतो, त्यामुळे त्याच्या अधिक
सेवनाने पोटासंबंधित विकार असिडिटी, पोटदुखी, अतिसार देखील
होऊ शकतो.
२) जास्त प्रमाणात आल्याचे सेवन केल्यास डोकेदुखी,
मायग्रेन, निद्रानाश अशी समस्या उत्पन्न होऊ शकते.
३) जास्त प्रमाणात आले खाल्यास तोंड येणे, ओठांना छाले
पडणे, सूज येणे आणि शरीराला खाज सुटणे अशा अलर्जी सारख्या
समस्या उद्भवू शकतात.
४) आल्याचं अधिक प्रमाणात सेवन केल्याने इन्शुलिनची
मात्रा वाढते, त्यामुळे शरीरातील शुगर ची लेव्हल कमी होण्यास
कारणीभूत ठरते. म्हणून मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी विशेष
काळजी घेतली पाहिजे.